सागरांत येथे लाट पुनवेच्या भरती ओहोटीची
चंद्रसागराची भेट होती रात्री पहाटेची
शांत पाण्यावर डुले नौका वाट पहाते पैलतीराची
वारा शिरे शिडात सांगे गोष्ट गाण्याची ।।१।।
दोन सागरांची भेट होते पुनवेच्या साक्षीने
लाटेवर चंद्र हेलकावतो जणू पाण्यातील लोणी
कोळ्यांचे गं गीत आनंदाने ऐकेल कां कोणी
दोन प्रेमिकांची मने जुळतील पुनवेच्या कोंदणी ।।२।।
कित्येक लाटानी आले काठावरती शंखशिंपले
प्रत्येक लाट दुसरीस सांगे आपले आयुष्य संपले
सागरी आयुष्य आले मानवाच्या जीवनी
शांत हो मानवा नकोच भटकू जगाच्या रानीवनी ।।४।।